१९ फेब्रुवारी १६३०शिवनेरी किल्ला, जुन्नर
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. त्यांच्या मातोश्री जिजाबाई यांनी लहानपणापासूनच रामायण-महाभारतातील कथा आणि स्वराज्याचे संस्कार त्यांच्यावर रुजवले.
वडील शहाजीराजे विजापूरच्या आदिलशाहीच्या सेवेत सरदार होते. दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली शिवबांचे शिक्षण पुणे जहागिरीत झाले.
संकलन: शिवजयंती संपादकीय टीम
स्रोत: Wikipedia (English) · मराठी · CC BY-SA
